Ankush Kakde on CM Shinde: 'पुणे महापालिकेमध्ये मविआचा विजय होईल'; अंकुश काकडे यांचा विश्वास | Pune

2023-03-01 2

राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत जनतेने भाजपाला नाकारले आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक देशाला आणि राज्याला दिशा देणारी ठरणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचा विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी केला. तसेच 'आता त्यांनी निवडणुका घेतल्या पाहिजे. केवळ तारीख पे तारीख सुरू असून एकदाच्या निवडणुका घेऊन टाका. निवडणुक घेण्याची धमक त्यांच्यामध्ये (भाजपा) नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये धमक नाही.ठाण्यात महापालिका निवडणुक होऊ द्या,आदित्यसारखा एक कोवळ पोरगा तुम्हाला आवाहन देतो. ठाण्यात येऊन निवडणुक लढवायला तयार आहे. तुमच्यात धमक आहे. तर राजीनामा द्या आणि त्या पोराविरोधात लढा' अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी टोला लगावला.

Videos similaires